About Us

  “अक्षय खजिना” ह्या लोकप्रिय वेबसाईटवर आपले स्वागत आहे. माणसाला प्रगल्भ करणारा कोणता खजिना असेल तर तो ज्ञानाचा. अन् ह्या ज्ञानात भर पडते ती वाचनाने. अवांतर वाचनाने निरंतर चिंतनाने मनुष्याची प्रतिभा उंचावते. अन् अशा प्रतिभावान मनुष्याला ज्ञानार्जन करण्यास साहाय्यक ठरतो तो कधीही न संपणारा माहितीचा स्त्रोत म्हणजेच “अक्षय खजिना”.

 “अक्षय खजिना” ह्या या वेबसाईटवर तुम्हांला नवनवीन मराठी कथा, कादंबऱ्या वाचता येतील. तसेच प्रेमकथा, रहस्यकथा, आणि सामाजिक विषयांवरील कथा वाचनाचा आनंद घेता येईल.

आपण हा खजिना मनसोक्त स्वत:वर उधळवून घ्यावा अन् आपल्या ज्ञानाची किंमत वाढवावी. विचारांची चांदी करावी अन् आपली संस्कृती हिऱ्यासम चमकवावी.

नमस्कार !

माझं नाव अक्षय आहे. मी राहायला मुंबईत आहे. सध्या मी साहित्यक्षेत्रात लेखक म्हणून पदार्पण केलं आहे. आत्तापर्यंत माझ्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यातील पहिली कादंबरी “सखी” ही एक रोमँटिक थ्रिलर प्रकारातील आहे. तर दुसरी कादंबरी “आरशातलं प्रेम” ही एका सामाजिक विषयावरील रहस्यकथा आहे. तिसरी कादंबरी “अधुरी कहानी” हि आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे.

माझं प्राथमिक शिक्षण मुंबईत “आदर्श विद्यालय”, गोरेगाव येथे झालं आहे. माध्यमिक शिक्षण “पाराशर हायस्कूल पारगांव”, कोल्हापूर येथे झालं आहे. “इन्स्ट‍िट्यूट ऑफ सिव्हिल ॲण्ड रूरल इंजिनिअरिंग”, गारगोटी या संस्थेतून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्याचबरोबर “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ” येथून राज्यशास्त्र हा विषय घेऊन मी माझं पदवीच शिक्षण पूर्ण केलं आहे.

वाचता वाचता निर्माण झालेली लेखनाची आवड मला साहित्यक्षेत्राकडे घेऊन आली. त्यामुळेच माझ्याकडून माझी पहिली कादंबरी “सखी” ही निर्माण झाली. पहिल्या कादंबरीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळेच मी माझी दुसरी कादंबरी “आरशातलं प्रेम” ही पुस्तक रूपात तर तिसरी कादंबरी “अधुरी कहानी” ही “अक्षय खजिना” या वेबसाईटवर प्रकाशित केली. तीनही कादंबऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला अन् मिळतो आहे.

सध्या मी माझ्या “अक्षय खजिना” या वेबसाईटवर मराठी कथा, नवनवीन प्रकारचे माहितीपर लेख, कादंबरी इत्यादी विषयासंबधी लेखन करत आहे.

आरशातलं प्रेम

प्रेम व्यक्त होण्यापूर्वीच आलेला दुरावा आणि त्यातून निर्माण होत गेलेलं रहस्य म्हणजेच “आरशातलं प्रेम”. ही रहस्यकथा आपल्याला सध्याचं समाजातलं वास्तव दाखवते. “प्रणाली प्रकाशन” पुणे यांच्यामार्फत माझी ही दुसरी कादंबरी १९ फ्रेब्रुवारी, २०२३ रोजी प्रकाशित झाली आहे.

Available On – Amazon And Bookganga

सर्वद फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ सालच्या “राज्यस्तरीय स्टार साहित्यिक” या पुरस्काराने सन्मानित.

Connect with me !