अधुरी कहानी – भाग १
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“शरीरसुख”
“मेला असेल का तो.. की वाचला असेल.. कसा वाचणार.. इतक्या जोरात पडला तो.. पण पाण्यातच पडलाय.. नसेल लागलं त्याला.. पण त्याला पोहता येतं का.. येत नसेल तर.. नाही नाही.. येत असणार.. गावचाय तो.. नक्कीच येत असणार.. पण लागलं तर नसेल ना त्याला.. चुकून दगडावर पडला नसेल ना.. शिट शिट शिट.. काय केलं मी हे.. काय होईल आता..”
ती डोकं धरून तशीच रागात खाली बसली. अंग गोठावणाऱ्या थंडीत तिचं शरीर घामाघुम झालं होतं.
“काही नाही होणार त्याला.. पोहता येत असणार.. वाचेल तो.. नक्कीच वाचेल..” ती स्वतःशीच बडबड करत राहिली.
“वाचला तर तो नक्कीच मला शोधणार.. सोडणार नाही तो मला.. जे होईल ते होईल.. पुढचं पुढं बघू.. नको जास्त निगेटिव्ह विचार करायला.. तो वाचेल अन् जिवंत असेल.. नक्कीच.. होय नक्कीच. काही नाही होणार.. काही नाही होणार..” मनाची समजूत घालत ती बराच वेळ बडबड करत राहिली.
वातावरणातली शांतता तिचं मन खात होती. कुठून तरी येणारा किर्र ऽ आवाज तिच्या मनात संशय निर्माण करत होता. बाहेर लुकलुक करणारा दिवा तिच्या जीवाची धाकधूक वाढवत होता. पानांचा सळसळ आवाज तिच्या कानांना भीतीची चाहूल ऐकवत होता. हळूच येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर मृत्यूचा शहारा आणत होती.
ती उठली अन् फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली. “काही नाही होणार.. काही नाही होणार..” तिची बडबड चालूच होती..
चेहऱ्यावर पाणी मारून ती पुन्हा सोफ्यावर येऊन बसली. भीती घालवण्यासाठी तिने टीव्ही चालू केला. टीव्हीवर फिरणाऱ्या काळ्या मुंग्यांचा ताफा पाहून तिने रागात टीव्ही बंद केला.
मनात चलबिचल होतंच होती. नको नको ते वाईट विचार मनात येत होते. अंधारलेल्या रात्रीत अनोळखी सावल्यांचे भास होत होते.
“कुठे येऊन फसली यार मी.. शीट.. जो प्लॅन ठरलेला तो पण कॅन्सल केला.. निदान त्याला तरी बोलावलं असतं.. काय केलं मी.. तो तरी असेल का इथे.. का निघून गेला असेल.. नाही, मला नाही वाटत गेला असेल म्हणून.. लगेच कसा जाईल.. इथेच कुठेतरी थांबला असेल..”
“काय करू.. करू का त्याला फोन.. बोलावू इथे.. येईल का तो.. का नाही येणार.. त्यालाही तेच हवं होतं जे मला हवं होतं.. फुकटचा सेक्स कोणाला नकोय.. !”
“शरीराची भूक जिभेसारखी असते चटक लागण्याचा अवकाश. एकदा चटक लागली की पोट फुटेपर्यंत चवताळलेलीच असते. शेवटी तोही पुरुषच.. चटक लागलेला.. येईलच..”
“सॉरी फॉर माय बिहेवियर.. कॅन वी मिट..?”
ती क्षणभर थांबली अन् नकारार्थी मान हलवत टाईप केलेला मेसेज डिलीट केला. एक क्षण विचार करून नवा मेसेज टाईप केला.
“लेट्स सेक्स..!”
पापणी लवेपर्यंत समोरून रिप्लाय आला,
“ओके.”
तिने हसऱ्या नजरेत गाल उंचावला अन् डोळ्यावरून एक हात फिरवत नि:श्वास सोडला.
“नशीब आहे इथेच.. नाहीतर आजच्या रात्री माझं काय खरं नव्हतं..” तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती ऊठली अन् सरळ वॉशरूमच्या दिशेने गेली.
गरम पाण्याचा शॉवर घेऊन ती तशीच स्वतःचं नग्न शरीर आरशात न्याहाळू लागली.
“बस अजून थोडाच वेळ..” म्हणत ती गालातल्या गालातच हसली.
सुती कापडाने शरीराचा एक एक भाग पुसू लागली. कमरेत अलगद वाकून ती स्वतःचे केस कोरडे करू लागली. गवताच्या पातीसारखे तिचे लांब सडक काळेभोर केस हलक्याशा उजेडात चमकू लागले. कोणालाही क्षणात आकर्षित करू शकणाऱ्या आपल्या मादक देहाला ती हळुवार हाताने पुसू लागली. अंगाभोवती सुती कापड गुंडाळून ती तशीच बाहेर आली अन् आपल्या खोलीत जाऊन “या क्षणासाठी खास विकत घेतलेला ड्रेस” घालून तयार होऊ लागली.
“खूप वाट पाहिली.. वाटलं होतं त्याच्यासोबत लग्न करून आयुष्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल.. पण तो नीचचं निघाला.. माझ्यात काय कमी होती.. मी पण कशी अडकली त्याच्या जाळ्यात.. वाटत होतं त्याच्या शरीरावर हक्क गाजवता येईल पण तो तर समाजात नागडा होऊन फिरत होता.. कसं काय दिसलं नाही मला.. हरामखोर कुठला.. लायक होता तोच नालायक निघाला.. अन् आता हे शरीर कोणाच्या स्वाधीन मी करतेय कोणास ठाऊक.. त्याची ना ओळख ना पाळख.. कोण कुठला मुलगा काय माहित.. तरीसुद्धा त्याच्यासोबत संबंध जोडायला मी तयार झाले.. तशी गरज मला पण आहेच.. पण काय करणार वेळच माझ्यावर अशी आली आहे की..” तिने पुन्हा एक नि:श्वास सोडला.
स्वतःची अन् मनाची तयारी करून ती सोफ्यावर जाऊन बसली. वातावरणातल्या शांततेला तिच्या मनातली चलबिचल जाणवत होती. नारळाच्या झाडांनी वेढलेला आसपासचा परिसर अंधाराच्या सावलीत अदृश्य होत होता. तिची नजर घड्याळाकडे गेली. अकरा वाजत आले होते. ठरलेली वेळ जवळ येत होती. बाहेरून येणारा पावलांचा आवाज कोणीतरी येत असल्याची जाणीव करून देत होता. अचानक तिची धडधड वाढू लागली. सोबतच ट्यूबलाईटचीही लुकलुक सुरू झाली अन् अचानक संपूर्ण परिसर काळोखात गुडूप झाला.
दारावर टकटक होताच ती दचकली. तिचा श्वासोच्छवास वाढू लागला.
“कोण..?” तिने आवाज दिला.
दारावर तीन वेळा टकटक झाली.
“पासवर्ड..?” ती दाराजवळ जात म्हणाली.
“भूक” बाहेरून सौम्य आवाज आला.
क्षणभर ती विचारात पडली. आवाज ओळखीचा वाटू लागला. परंतु या गोष्टीच नियोजन फक्त एका व्यक्तीलाच माहीत होतं हा विचार करून तिने मनातले इतर विचार क्षणात झटकून टाकले.
“री कन्फर्म..?” ती जरा शंकेच्या सुरातच म्हणाली.
क्षण दोन क्षण गेले. आवाज आला नाही. ती पुन्हा म्हणाली,
“री कन्फर्म..?”
दिर्घ श्वासात बाहेरून तोच सौम्य आवाज आला,
“हवस..”
तिने काळजी मिटल्याचा नि:श्वास सोडला अन् दार उघडल. बाहेर काळोखात तिला तो दिसला नाही पण त्याच्या अंधारातल्या सावलीने तो उंच असल्याची माहिती दिली. तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तिने दार बंद केलं. तिच्या वाढलेल्या श्वासोच्छवासाची गती त्याच्या कानापर्यंत गेली. त्याने आणखी जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याच्या उबदार स्पर्शाने ती शहारली अन् क्षणाचाही विलंब न करता तिच्या कोमल ओठांनी त्याच्या रूक्ष ओठांना स्पर्श केला. एकमेकांना बिलगलेल्या, शरीराची भूक शमविण्यासाठी आसुसलेल्या त्या जीवांनी धडपडत धडपडत आतली खोली गाठली. हवेत तरंगणाऱ्या कपड्यांनी आकाशाकडे झेप घेतली तर काहींनी पाताळात उडी मारली.
उघड्या अंगावर रोमांच उभे राहिले अन् केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्त सळसळू लागले. श्वासोच्छवासाची गती शर्यतीत धावू लागली. दातांनी ओठांचा चावा घेतला तर पाटीने ओरबाडे सहन केले. उबदार हातांच्या पकडीत भरीव स्तनाग्रे फुललीत अन् कोमल पाकळी उमलू लागली. पायात पाय गुंतत गेले अन् ओठांची धरपकड सुरू राहिली. थंड कायेचा उबदार देहाशी मिलाप होऊ लागला. शितलतेच्या दरीत उष्णतेची लाट उसळ्या मारू लागली.
चंद्र ढगाआड लपला अन् चांदण्या आभाळाची चादर ओढू लागल्या. वारा सैरावैरा धावू लागला अन् पानांचा सळसळाट वाढू लागला. समागमाचा आवाज शांतता चिरू लागला अन् प्राण्यांनाही लाजवणाऱ्या किंकाळ्या दूरपर्यंत जाऊ लागल्या.
दूर दूर पर्यंत कोणी पाहणारं नाही का कोणी ऐकणारं नाही. कोणी विचारणारं नाही का कोणी अडवणारं नाही. पाहणारा चंद्र अन् ऐकणारी झुळूक दोघेही अबोल. समागमात घामाने लथपथलेली शरीरंही तशीच. एकमेकांना अनभिज्ञ. नावाने, चेहऱ्याने अन् मनानेही. ओळख फक्त गरजेपुरती अन् गरज फक्त शरीरापुरती.
अखेर दोन आत्म्यांची एकरूप झालेली किंकाळी वातावरणात गरजली. श्वासोच्छवासाची शर्यत संपली अन् रक्ताची गती मंदावली. उसळलेल्या लाटा शांत झाल्या. एकमेकांत गुंतलेल्या आत्म्यांची सुटका झाली अन् घामेजलेली शरीरं समाधानाच्या दरीत हरवून गेलीत.
कोंबडीच्या पिल्लांनी आपल्या आईच्या कुशीतून बाहेर डोकं काढावं तशी ती चादरीतून बाहेर डोकावली. चेहऱ्यावर एक समाधानी हसू ठेवून आळोखे पिळोखे देऊ लागली. आजची सकाळ तिच्यासाठी सुद्धा समाधानाची किरणं घेऊन आली होती. रात्रंदिवस होणारी तन-मन-आत्म्याची तडफड समाधानाच्या दरीत तल्लीन झाली होती.
तिने प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. पाठीवर उमटलेल्या आपल्या ओरबड्यांचे चुंबन घेऊन ती त्याच्या पाठीवर बसली. त्याच्या डोक्यावरून उशी बाजूला केली अन् त्याचा चेहरा उशीतून बाहेर काढण्यासाठी त्याला सरळ करू लागली.
त्याचा चेहरा पाहताच विजेचा तीव्र झटका बसावा तशी ती बेंबीच्या देठापासून ओरडली.
“आ ऽऽ..”
क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे रोमांचकारी हावभाव संतापात बदलले. अंगाची लाही लाही झाली अन् ती दोन्ही हातात डोकं धरून ओरडू लागली.
तिच्या ओरडण्याने तो उठला. तिला स्वतःच्या अंगावर नग्न अवस्थेत ओरडताना पाहून तोही दचकला अन् उंदरानं मांजराला पाहावं तसा तोही जाग्यावरच उडाला.
“ए ऽ तू .. तू इथं..?”
“ए ऽ गप..” ती त्याच्यावर नागिनीचा फणा काढून डवखारली अन् म्हणाली, “तू इथं कसा.. तू जिवंत कसा.. काय केलंस तू त्याच्यासोबत.. मारून टाकलंस..?”
“ए गप चांडाळीण.. तू मला मारायचा प्रयत्न केलास मी न्हाय कोणाला मारलं..”
“मग तू इथं कसा.. इथला पत्ता तुला कसा मिळाला.. मी तुझ्यासोबत रात्रभर सेक्स केला.. छी छी छी..” तशी ती त्याच्यापासून लांब झाली अन् स्वतःचं शरीर चादरीत गुंडाळू लागली.
त्याने आपलं उघड शरीर दोन उशांमध्ये लपवलं अन् स्वतःची कपडे इकडे तिकडे शोधू लागला.
दोघांनाही चांगलाच झटका बसला होता. कधीही एकमेकांची तोंडं न पाहण्याचा विचार करणारी ती दोघं रात्रभर समागमात तल्लीन झालेलीत. आपण कोणासोबत आहोत याची जरासुद्धा कल्पना नसणारे ते दोघं आता मात्र एकमेकांना ओळखून त्रागा करू लागलेलीत.
दोघेही रागाने, आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागलीत. तिने रागा रागात टेबलावरचा ग्लास त्याच्या दिशेने फेकला. त्याने तो चुकवला.
“ए काय करालीस लागंल मला..”
“मर तू.. मेला का नाहीस..” तिने इकडे तिकडे पाहिलं अन् हाताला लागेल ते त्याच्या अंगावर फेकू लागली. तो तिचे वार चुकवू लागला. तो बेडवरून उठला अन् खाली पडलेला सुती कपड्याचा टॉवेल स्वतःभोवती गुंडाळू लागला. तिने चादरीत स्वतःला घट्ट गुंडाळून घेतलं अन् त्याच्यावर हाताला येईल त्या वस्तू फेकून मारू लागली. तो तिच्या जवळ गेला अन् तिला अडवू लागला. ती त्याला झिडकारू लागली. त्याने जोरात तिच्या कानाखाली लगावली. ती संतापली अन् टेबलावरचा बारका काचेचा फ्लॉवर पॉट तिने त्याच्या डोक्यावर फोडला. तो तसाच बेशुद्ध पडला. त्याच्या डोक्यावरचं रक्त पाहून ती सुद्धा चक्कर येऊन खाली पडली.
सूर्य आपलं तेज तळपू लागला. पक्षांचा किलबिलाट गोंगाटात बदलला. नारळाच्या झावळ्या सळसळ आवाज करू लागल्या. गार हवा गरम होऊ लागली अन् प्रेमाचे वारे संतापात वाहू लागले.
अधुरी कहानी – भाग ०२
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!