अधुरी कहानी – भाग ०५
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – तहान”
दमूनभागून अनिकेत घरी आला. हातपाय धुऊन गावातून एक फेरफटका मारून बाहेरच कट्यावर जाऊन बसला.
“मग अन्या तब्येत पाणी एवस्थित.” एका भारदस्त आवाजाच्या व्यक्तीने पाठीमागून येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारपूस केली.
“नाथाभाऊ या कि.”
“म्हटलं जेवाण झालं का नाय..?”
“नाय जेवायचं सावकाश.. तुमचं नाथाभाऊ.. या बसा..”
“नाय अजून येळ हाय.. काय चाललंय मग कसल्या इचारात हाय..” नाथाभाऊ त्याच्या शेजारी बसत म्हणाले.
“कुठं काय बसलो जरा वाईच.”
“कामाव समदं ठिक न्हवं.”
“व्हय..”
“घरात.. संत्या येतंय का नाय खाली.. का वरतीकडचं राहतय..?”
“कुठं दोघंपिन माळावच राहत्यात न्हवं.
“या म्हणाव कवा तर खाली.. ही पिन घर हाय..”
तो शांतच राहिला.
“म्हातारीला ऱ्हाऊ वाटतंय काय खाली.. तिला तर त्या घरात ठिवा..”
“आय तर कुठं ऐकत्या.. पप्पा म्हणतंय तू वर इवून ऱ्हा.. आय म्हणत्या तुम्ही खाली इवून ऱ्हावा.”
तसे दोघेही हसले.
“चालायचं अनिकेत राव.. दोन्ही बी तुमचीच प्रॉपर्टी.. घ्या आता जुळवून..”
“कसलं काय नाथाभाऊ.. प्रॉपर्टी काय उराव घिऊन बडवायची. माणसं नगोत घरात.”
“ती बी हाय म्हणा.”
“सच्याचं काय.. दुसरीकडं कुठ जुळतय का.. ?“
“काय माहित.. ती बी बोलत नाय एवस्थित.. आपल्याच धुंदित..”
“काय करणार म्हणा ती बी.. घटस्फोट छळतोय बघ अन्या.” नाथाभाऊ गंभीर नजरेत म्हणाले. “घे बाबा समजून.. तूच तेवढा समजूतदार.. माझ्या अण्णांचा पिन तुझ्यावंच जीव..” तसे ते जरा भाऊक झाले..
क्षणभर कोणी काहीच बोललं नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना पाहत दोघेही शांतच राहिले.
“नाथाभाऊ नाग्याची काय भानगड.. कवापासन बगा वर पंचायतीच्या गच्चीवर हाय..” ग्रामपंचायतच्या गच्चीवर फोन वर बोलत फेऱ्या मारणाऱ्या नागेशकडे पाहत अनिकेत नाथाभाऊंना विचारू लागला.
“नाग्या व्हय… श्याण्या बोड्याचं हाय वी ती..”
“आता आणी काय केलं म्हणायचं.”
“काय काय गुण गायाचं..?”
“का ओऽ..?”
“बायको गेली न्हवं म्हाहेरी..”
“काय सांगताय.”
“तर.”
“कशामुळे ते..?”
“नाग लय उडालता बेण्याचा..”
“काय झालं तर काय म्हणायचं..?”
“अन्या नवी नवरी म्हंजी कशी अशी कोमल मुलायम अशी नाजूक फुलावाणी असती..” नाथाभाऊ आपल्या एका हाताची ओंजळ करत हातवारे करत बोलू लागले.
“अन् फुलाला कसं आपण हाताच्या फोडाप्रमाणे जपलं पायजे.. हाय का नाय..?” आपल्या एका हातावर प्रेमानं हात फिरवत नाथाभाऊ अनिकेतच्या डोळ्यात डोळे घालून पटवून सांगू लागले.
“जर समजा त्या फुलाला आपण असं दोन्ही हातात धरून दाबलं तर ते फुल जगंल का.. चेंदा मेंदा न्हाय का व्हायचा..?” नाथाभाऊन आपले दोन्ही हात एकमेकांना दाबून अनिकेतला प्रश्न विचारला.
“व्हणार की.”
“तेच झालं.. झवण्यानं फुलाचा पार चेंदा मेंदा केला.”
अनिकेतन प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं.
“हाणलं काय बायकोला..?”
“समजाय नाय वाटतं अजून तुला.”
अनिकेतन नकारार्थी मान हलवली.
“अन्या आपल्या शरीराची मर्यादा असती एक.. सहनशक्ती असती एक.. हिसकं सोसायची कॅपॅसिटी असती एक.. असती का नाय.?”
“असत्या तर.”
“आता तु सांग रात दिस जनावरावानी बाई माणसाला हिसकं दिल्यावर काय व्हणार..?”
अनिकेत शांतच झाला.
नाथाभाऊ फेऱ्या मारणाऱ्या नागेशकडे रागाने पाहत बोलू लागले.
“मी तर म्हणतो अन्या ती पोरगी यायलाच नको परत.. झवण्याचा नाग लय फोफाटलाय.. तडपूनच मराय पायजे.. नागाला या बिळात घुसायची लय हौस हाय.. याचा तुकडाच पडला पायजे बघ..”
अनिकेत शून्यातच हरवला होता.
“अन्या”
“हां ऽ”
“काय म्हणतोय मी”
“व्हय बरोबर हाय”
“तेच.. एकदा माझ्या तावडीत घाऊ दे गा ऽ.. न्हाय याचा नाग चेचला ना नाव नाय लावणार..”
“नाथाभाऊ धीरानं तुम्ही का राग काढताय नाग्याव.. तुमच्यासोबत काय..?”
“तसं न्हाय रं.. वाईट वाटलं ऐकून लेकीचं.. लग्न का करतात अन्या.. नाती वाढवण्यासाठी.. जोपासण्यासाठी.. एकमेकांना प्रेमाने, मायेने गोंजारण्यासाठी..अन् हे शेमनं काय करतंय..” नाथाभाऊने आपली तर्जनी दोन बोटांच्या गोलाकार छिद्रात खालीवर करत संताप व्यक्त केला.
“जाऊ द्या नाथाभाऊ.. त्याचं नशीब त्याच्या संग.. आज ना उद्या कर्मान जाईलच ती..”
“जायलाच पायजे न्हायतर मी हायच..” नाथाभाऊंची नजर फेऱ्या घालणाऱ्या नागेशवर खिळून राहिली.. अनिकेत पुन्हा त्याच्या लग्नाच्या दुखी जहाजात स्वार झाला अन् खोल खोल बुडू लागला.
“का मावची..?” चार वर्षांच्या प्रियांशने आपल्या मावशीकडे रागात बघितलं..
“बघायचं नाही असलं काय खोट आहे सगळं.. जा बाहेर जाऊन खेळजा.. दिवसभर नुसता टीव्ही, मोबाईल..”
“तेम तू यू..” प्रियांशने त्याच्या जवळची रिमोट कार अनिकाच्या अंगावर फेकली अन् तिला चिडवत बाहेर पळालां.
“ए ऽ माकडा इकडे ये.. मला बोलतोस काय..?”
प्रियांश दरवाजा जवळ परत आला. तोंड वाकडं करत अनिकाला “माकदीन माकदीन” चिडवत पुन्हा खाली पळाला.
“अनी ऽ.. साडी आणायला कधी जाणार आहेस..?” अनिकाच्या आईने किचन मधून आवाज दिला..
अनिकाने कपाळावर आठ्या आणत “जाते” म्हणून आवाज दिला..
आपला ड्रेस सरळ करत ती उठली अन् अंगावर ओढणी घेत घराबाहेर पडली..
“अनी ऽ ब्लाउजचे पण पैसे द्यायचेत गं..” तिची आई किचन मधूनच ओरडली पण अनिका कधीच लिफ्ट मधून खाली पोहोचली होती..
“या मॅडम बऱ्या बाहेर पडला आज..” मशीनवर बसलेल्या नलिनीताई अनिकाकडे हसत म्हणाल्या.
अनिकाने डोळे मिचकावले अन् चेहऱ्यावर हसू आणलं.
“आईने पाठवलं साडी आणायला..”
“हे काय तुमचंच काम चाललंय.”
“वेळ लागेल ?”
“का घाई आहे ?”
“नाही असंच विचारलं.”
“होईल इतक्यात बघ.. झालं जेवण..?”
“कधीच.. भाजी छान झालेली आज.”
“तुझ्यासाठीच पाठवली.. तुला आवडते ना..?”
“काही पण म्हणा ताई तुमच्या हाताला खरंच चव आहे.. मेंबर्स खुश होत असतील तुमच्या वर..”
“हो ना..?”
“हो तर.. घराचं कुठपर्यंत जमलं.. मिळतेय एखादी खोली..?”
“चाललंय बाळ.. पैसे नको का लवकर जमायला.. थोडेफार जमले की जीतूच्या औषध पाण्यालाच लागतात.. बघतेसच आहे तू..”
“किती करणार ताई.. खरं सांगू.. बास करा आता.. पॅरालिसिस नाही होत बरा..”
“बघू आता एक नवीन औषध चालू केलंय.. बाकी काय म्हणतेस काय केलंस आज..?” नलिनीताईंनी विषय बदलत तिला विचारलं..
“काय करणार.. दुसरं काम काय मला.. खायचं, प्यायचं, झोपायचं बस..”
“अजून किती दिवस सुट्टीवर आहेस..?”
“आहे अजून पंधरा दिवस.. पुढच्या महिन्यात जॉइनिंग आहे.. “ताई”, अनिका त्यांच्या सोफ्यावर आडवी झोपत म्हणाली. “कंटाळा आलाय कामाचा..”
नलिनीताई गालातच हसल्या अन् म्हणाल्या, “नको जाऊस मग कामावर..”
“असं वाटतंय काहीच नको करायला आयुष्यात.. नुसतं खायचं, प्यायचं, फिरायचं, झोपायचं बास.. कसलं टेन्शन नाही काय नाही..”
नलिनीताई गालातल्या गालातच हसू लागल्या.
“आणि काय..?”
“आणि.. तुमच्यासोबत गप्पा मारत दिवस घालवावा, आमच्या माकडा सोबत खेळावं अन् मनाला वाटेल ते करावं.”
नलिनीताई नुसत्याच हसत होत्या.
“चांगलय चांगलय.. तुझ्या मनासारखं होवो.”
“हम्म्म ऽ.. पण मला माहितीय असं काहीच होणार नाही.. जो विचार करते नेमकं त्याच्या उलटच काहीतरी होणार.. एवढं तरी शिकले मी आयुष्यात..” अनिका थोडी गंभीर होऊनच म्हणाली..
अन् तिला गंभीर झालेलं पाहून नलिनीताईंनी तिला बोलतं केलं.
“किती लांब आहे गं तुझी आत्ताची कंपनी..?”
“हैदराबादला..”
“च्च् ऽ..” अनिका ओठ चुचकारत म्हणाली, “कम्प्लीट वर्क फ्रॉम होम..”
“म्हणजे तू तुझ्या निर्णयावर ठामच आहेस.. अजिबात माणसात जाणार नाहीस..”
“माझी सावली सुद्धा पाडणार नाही..”
“अनिका..”
अनिका डोळ्यात पाणी आणून गंभीर मुद्रेत जमिनीच्या दिशेने पाहू लागली.
“असं कसं वागून चालेल बाळ.”
ती शांतच राहिली..
नलिनीताईंनी मशीन थांबवली अन् तिच्या शेजारी येऊन बसल्या.. तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या,
“असं करून कसं चालेल.. प्रत्येक ठिकाणी तीच माणसं असतील असं कशावरून.. अन् त्यांना तुझ्याबद्दल माहित असेलच कशावरून..?”
“माझी विचारपूस तरी करतील ना.. काय बोलणार मी..” अनिका हुंदके देत बोलू लागली..
“आधी शांत हो.. ठरलंय ना आपलं त्या विषयावर कधी बोलायचं नाही.. रडायचं नाही म्हणून..”
अनिकाने मान हलवत आपले डोळे पुसले.
“नाही जाऊ वाटत कुठल्या घोळक्यात.. मित्रांच्यात.. माणसांच्यात.. मी एकटीच बरी असंच वाटतंय सारखं सारखं..”
“हे बघ अनी.. एकदा चांगल्या माणसांची संगत मिळाली ना की सर्व व्यवस्थित होईल..”
“चांगली माणसे या जगात नाहीत ताई.. माझ्या आयुष्यात तर नाहीत..”
“किती दिवस अशी एकटी राहशील अनी..?”
“तुम्ही राहताना एकट्या.. तुमची बहीण राहते ना एकटी.. माझी ताई राहते ना एकटी.. तशीच मी पण राहीन एकटीच..”
“आमचं वेगळं आहे बाळा.. तुझ्या ताई जवळ कुणासाठी तरी जगायचं म्हणून एक आशा आहे.. आमचं काय घेऊन बसलीस.. आमचं काय वय राहिलं आता.. आम्ही मजबुरीत दिवस काढले.. तुझ्यासोबत तसं नको व्हायला म्हणून तुला समजावतेय.. तू अजून तरुण आहेस.. पुढे खूप आयुष्य शिल्लक आहे.. या मनस्थितीतून बाहेर काढ स्वतःला.. नको अशी एकटी राहूस..”
“तुला आता काय वाटत नाही.. तू आता स्वतःच्या जीवावर जगतेस म्हणून पोटाची भूक भागतेय.. पण शरीराची भूक.. ती कशी भागवणार..?”
अनिका गंभीरतेने नलिनी ताईंच्या डोळ्यात पाहू लागली..
“बघ.. डोळे सांगतात तुझे.. झोप येत नाही ना रात्र रात्रभर..”
अनिकाने जमिनीच्या दिशेने पाहिलं.
“कळतंय मला बाळ.. मी पण या परिस्थितीतून गेलीये. म्हणून तुला समजावतेय.. हा एकलकोंडेपणा सोडून मनमोकळेपणाने फिर.. तू काय गुन्हेगार नाहीस.. येईल कोणीतरी चांगला मुलगा आयुष्यात..”
“कधी येणार ताई.. किती वाट पाहणार.. तीस वर्षांची झालीये मी आता.. माझं वय बघून माझं पॅकेज पाहून चांगली चांगली मुलं नकार देतायत.. अन् तसंही कोणाला यायचं होतं तर मग तुमच्या आयुष्यात का कोण आलं नाही..?”
“हं ऽ ..” त्या विषण्णपणे हसल्या.. “प्रेम चेहरा बघून होतं अनिका.. मन बघून नाही.. माझ्यासारख्या जाड बाईवर कोण प्रेम करेल ? लोकांना डोळ्यांना आकर्षक वाटेल असं काहीतरी हवं असतं.. तो आकर्षकपणा नाही माझ्यात. तू माझ्यासारखी नाहीस म्हणून सांगतेय तुला..”
“तुम्हाला कधी सेक्स करू वाटला नाही..?” त्यांनी त्यांचे डोळे खोबणीत आत ओढून घेतले अन् हताश होऊनच बोलू लागल्या.
“अनिका सेक्स ही शरीराची गरज आहे. अन् मलाही खूप गरज होती त्यावेळी. पण माझी सुद्धा तुझ्यासारखीच अवस्था होती. कोणी मुलगा माझ्यासोबत लग्नाला तयार नव्हता. मीच काय माझ्या ताई सोबत सुद्धा. आम्ही दोघी अशा अंगानी जाडच्या जाड.. ओबडधोबड चेहऱ्याच्या.. कोणी आम्हाला पसंतच करायचं नाही..”
आम्ही काय अचानकच जाड झालो असं नाही.. लहानपणापासूनच आम्ही जाड आहोत.. दिसायला ओबडधोबड आहोत.. आता यात का आमची चूक होती का आमच्या आई-वडिलांची. जसं देवाने जन्माला घातलं तशाच आम्ही वाढलो.. उमेदीच्या काळात शरीर तडफडू लागलं.. रात्र रात्रभर झोप नसायची.. दिवसा कोणी पुरुष आसपास आला की अंगाची लाही लाही व्हायची..”
“मग.. मग काय केलं तुम्ही..?”
“काय करणार.. आपण स्वतः आपली तहान कुठपर्यंत भागवणार.. शरीराला गरज असणारं पाणी मिळेपर्यंत तन-मन नुसतं जळत होतं.. अखेर एक दिवस ती आग विझली..”
“कोणी..?” अनिका थोडी घाबरत घाबरतच म्हणाली.
नलिनी ताईंनी डोळे पाण्याने भरले अन् त्या नकारार्थी मान हलवू लागल्या अन् म्हणाल्या,
“ते नाही सांगता येणार अनिका.. नाही सांगता येणार..” अन् त्यांनी आपलं तोंड ओंजळीत लपवलं अन् तशाच रडू लागल्या.
“बघ बाळ मी स्वतःला कुठेतरी तुझ्यात पाहते. मी जे अनुभवलं ते तुला सांगितलं.. माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत होऊ नये असंच मला कायम वाटत आलंय.. आणि कायम मी तुला चांगलचं सांगणार..”
“मला माहितीये ताई.. तुम्हीच एक आहात ज्यांनी मला नैराश्यातून बाहेर काढलं.. तुम्हाला मी कधी विसरू शकणार नाही..” अनिकाने डोळे पाण्याने भरले.
“तुम्ही म्हणता तेही खरं.. पण मी कोणावर जबरदस्ती तर करू शकत नाही ना लग्नासाठी.. माझ्यासोबत काय झालं.. काय खरं काय खोटं.. हे जर मीच प्रत्येकाला स्पष्ट करत बसले तर ते खोटंच वाटणार.. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.. असा जोडीदार नको मला ताई.. मी काल परवा पर्यंत पॅकेज बघत होते.. घरदार बघत होते.. पण आता कळून चुकलंय.. चारित्र्यापेक्षा महत्वाचं काही नाही..अन् मी तुम्हाला सांगतेय असा कोणी मुलगा माझ्या आयुष्यात आला तर मी त्याला गमावणार नाही एवढं नक्की..”
नलिनी ताईंनी समजूतीने मान हलवली.. अनिका शांत मुद्रेत बराच वेळ तशीच बसून राहिली.. मशीनीचा आवाज सुरू झाला अन् त्या आवाजात अनिका शांतता शोधू लागली.
अधुरी कहानी – भाग ०६
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!